मानखुर्दमध्ये बेस्ट बस पेटवणाऱ्या तिघांना अटक


मानखुर्दमध्ये बेस्ट बस पेटवणाऱ्या तिघांना अटक
SHARES

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मानखुर्दमध्ये बसची जाळपोळ करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र शिंगारे, पंकज थोरात, अजित सरवाने अशी या आरोपींची नावं आहेत. या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.


मानखुर्दमध्ये बस पेटवली

बुधवारी मराठा समाजाने पुकारलेल्या बंद दरम्यान पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीतून घेतलेल्या खबरादीमुळे मुंबईत सुरुवातीला कुठेही हिंसक वळण मिळालं नव्हतं. मात्र मानखुर्द येथे आंदोलनादरम्यान बेस्ट पेटवल्यामुळे शांततेत सुरू असलेल्या या मोर्चाला हिंसेचं गालबोट लागलं. त्यामुळे काही काळ मानखुर्दमध्ये तणावाचं वातावरण होतं.


अग्निशमन दलाने आग विझवली

यावेळी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बेस्ट बसला लागलेली आग विझवली. यासर्व घटनेचं पोलिसांनी मोबाइलवर चित्रीकरण केलं होतं. या चित्रीकरणातच महेंद्र, पंकज आणि अजितने दुचाकीचे पेट्रोल काढून बेस्टबसवर फेकून बस पेटवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला.

गुरुवारी याप्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधात सरकारी मालमत्तेचं नुकसान, हिंसा घडवण्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.


हेही वाचा - 

मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

कळंबोलीतील उद्रेकानंतर 'मराठा क्रांती मोर्चा'चा मुंबई बंद स्थगित!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय