Advertisement

मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू


मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
SHARES

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कोपरखैरणेत झालेल्या हिंसाचारामुळे जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर (21) असं या तरुणाचं नाव आहे. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे येथे दगडफेकीत रोहन तोडकर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.


दगडफेकीत जखमी

बुधवारी 21 जुलै रोजी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे रायगड, सातारा या परिसरात बंदची हाक देण्यात आली होती. मात्र नवी मुंबईतील कळंबोली आणि कोपरखैरणेत या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दरम्यान या ठिकाणी दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत रोहन तोडकरच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. ज्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.


20 पोलिस जखमी

नवी मुंबईच्या कोपरखैरणे आणि कळंबोलीत या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 20 पोलिस कर्मचारीही जखमी झाले. यामध्ये 150 हून जास्त वाहनांच नुकसान झालं. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 40 शॉटगन राउंड, 22 रबर बुलेट, अश्रूधुरांचा वापर केला.

या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही परप्रांतीयांची समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा -

राज्यभरात 5 दिवसांत 155 हून अधिक गुन्हे दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा