धावत्या कारमध्ये खिडकीत बसून मद्यप्राशन, पोलिसांची कारवाई

पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

धावत्या कारमध्ये खिडकीत बसून मद्यप्राशन,  पोलिसांची कारवाई
SHARES

धावत्या कारच्या खिडकीत बसून मद्यप्राशन करणाऱ्या दोन विकृतांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर वायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत अखेर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. या प्रकऱणी  पोलिस अधिक तपास  करत आहेत.

हेही वाचाः -'बेस्ट'मधील २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त, ५२ जणांचा मृत्यू

मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस भरधाव वेगात कार चलवत, त्या कारच्या खिडक्यांमध्ये बसून दोन विकृत मद्यप्राशन करत मस्ती करत होते. त्याचे हे कृत्य धोकादायक होतं. यात एकाचा जरी तोल गेला असता. तर मोठा अपघात घडला असता. या दोघांच्या या मस्तीचा व्हिडिओ एका सुजान नागरिकांने काढून तो सोशल मिडियावर पोलिसांना टॅगकरून अपलोड केला. ही मुल वांद्रेहून कांदिवलीला येत होते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. त्याच्यावर अनेकांटी तिखट  प्रतिक्रियाही दिल्या , अखेर या व्हिडिओची गंभीर दखल पोलिसांनी घेत, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी पोलिसांनी चालक आणि दोन टवाळखोरांना अटक केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा