पवईच्या महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशनच्या सुरक्षारक्षकांना मारहाण


पवईच्या महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशनच्या सुरक्षारक्षकांना मारहाण
SHARES

पवई तलावात मासेमारी करण्यास विरोध केल्याने ७ जणांनी पवई येथील महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशनच्या सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी ७ जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.


संपूर्ण प्रकार

महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशनने तुंगागाव येथे राहणा्ऱ्या देवप्रकाश रामसेवक यादव (३५) यांच्यावर पवई तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या तलावात कोलकत्ता येथून वेगळ्या प्रजातीचे मासे आणून सोडले जातात. या माशांना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे गुंड मासेमारीसाठी जाळी टाकतात. गुरुवारी तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे भरत गुप्ता यांनी तलावात मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आल्याची माहिती त्यांना दिली होती. ज्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील ६ जाळी ताब्यात घेतली होती. त्यावरून मारहाण करणाऱ्यांनी सुरक्षारक्षक रामसेवक यादव याला भेटून वेळोवेळी धमकावले. 


गुन्हा दाखल

शुक्रवारी रात्री गुप्ता तलावाची देखरेख करत असताना, रात्री साडेबाराच्या सुमारास हातात काठी घेवून आणि तोंडाला रुमाल बांधून ६ ते ७ जण क्लबमध्ये घुसले आणि त्याला मारहाण केली. त्यावेळी गुप्ताच्या बचावासाठी यादव पुढे सरसावले. त्यावेळी गुंडांनी त्यांना देखील मारहाण केली. या प्रकरणी यादव यांनी पवई पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा