'या' सराईत घरफोड्यांना अटक


'या' सराईत घरफोड्यांना अटक
SHARES

उत्तरप्रदेशमधून मुंबईत आलेल्या घरफोडी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून पोलिसांनी 3 लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला असून पोलिसांनी यामध्ये 12 गुन्ह्यांची उकल देखील केली आहे.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात 3 महिन्यांपूर्वी एकाच वेळी 4 घरफोड्या झाल्या होत्या. याबाबत टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकाने तीन महिन्यापासून अपार मेहनत घेऊन मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण भागातील घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींच्या गुन्हे पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. दरम्यान टिळक नगर परिसरात घरफोडी करणारे आरोपी हे उत्तरप्रदेशचे असल्याची माहिती हाती लागली. 15 जुलै रोजीे मुंब्रा कौसा येथील एका घरात हेच आरोपी घरफोडी करण्याकरता शिरले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. या आरोपींनी मुंबईसह दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.


या आरोपींना केली अटक

इम्रान कुरेशी (24), अफझल कुरेशी (27), शाहीर अनवर मो. कय्युम शेख (35), इरफान अलवी (35) आणि समीर शेख (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे असून हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली आहे.



हेही वाचा -

घरात घुसून जबरी चोरी

चेंबूरमध्ये पोलिस चौकीसमोरच चोरी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा