चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

 Kurla
चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

कुर्ला - एका अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा पायऱ्यांवरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ठक्कर बाप्पानगरमध्ये घडली. या मुलाचं नाव प्रेमचित तारा सिंह आहे. हा चिमुकला आपल्या घरात खेळत होता. खेळणं घराबाहेर पडल्यानं तो खेळण्यापाठोपाठ गेला आणि पायऱ्यांवरून उतरताना पाय घसरून पडला. त्याला कुर्ला येथील चिंतामणी रुग्णालयात नेल्यावर शीव येथील टिळक रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं, तिथे नेल्यावर डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केलं.

Loading Comments