टॉप्स ग्रुप घोटाळा: नंदा यांचे विश्वासू एम. शशीधरनला यांना अटक

शशीधरन हा तोच व्यक्ती आहे. ज्याच्यामार्फत नंदा यांनी केलेल्या तक्रारीनंतर टॉप्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

टॉप्स ग्रुप घोटाळा: नंदा यांचे विश्वासू एम. शशीधरनला यांना अटक
SHARES

टॉप्स ग्रुपचे संस्थापक व कंपनीतील वरिष्ठ अधिकारी एम. शशीधरन यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) अटक केली. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स पाठवण्यात आला होता.

हेही वाचाः- CBSE board exam: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच?

पैशांच्या व्यवहारांमध्ये शशीधरन यांची प्रमुख भूमिका असल्याचा ईडीला संशय आहे. पैशांचे व्यवहार शशीधरन मार्फत झाले असून त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्याची चौकशीची आवश्यकता असल्याचे एका अधिका-याने सांगितले. ही याप्रकरणातील दुसरी अटक आहे. शशीधरन हा तोच व्यक्ती आहे. ज्याच्यामार्फत नंदा यांनी केलेल्या तक्रारीनंतर टॉप्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी चंडोळेला याप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्याला पुन्हा ताबा घेण्यात आला आहे.

हेही वाचाः- ‘नो मराठी’, ‘नो अॅमेझाॅन’, मनसे पुन्हा आक्रमक

एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्या ईडीने त्याच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले होते. चंडोले व शशीधरन यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच चंडोळेचा ताबा ईडीने घेतला. एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राट मधील ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी सांगितले होते.

हेही वाचाः- जेट एअरवेज घेणार पुन्हा भरारी

 मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीए चे कंत्रा टॉप्स ग्रुपला मिळाले होते. अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना ५ लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून ६ लाख रुपये पगार म्हणून दाखवण्या आली होती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा