फेसबुकवरील मैत्री पडली महागात, मद्य पाजून तरुणीवर अत्याचार

नुकतीच पीडित महिलाने तिची खोली बदलली. तिने भाड्याने नवीन खोली घेतली होती. हीमाहिती तिने शहाला सांगितली. त्यावर शहाने तिच्याकडे पार्टीची मागणी केली

फेसबुकवरील मैत्री पडली महागात, मद्य पाजून तरुणीवर अत्याचार
SHARES

फेसबुकवर नवीन मित्र-मैत्रिणी शोधताय, जरा जपून. बोगस नाव, बनावट फोटो वापरून मैत्री करून फसवणुकीच्या घटना वाढल्या असताना. या अनोळखी मित्रांची जवळीकता तुम्हच्यासाठी घातक ठरू शकते. नुकताच या प्रसंगाचा अनुभव जोगेश्वरीतील एका २२ वर्षीय महिलेला आला. फेसबुकवरील मित्राने पार्टीला बोलावून महिलेला मद्यपाजून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

हेही वाचाः-बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार, दोन कंपनी मालकांना अटक

जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मोहित शहा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. फेसबुकद्वारे एकमेकांशी वारंवार संवाद साधत असल्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबध निर्माण झाले होते. पीडित महिलाही एकटीच रहात होती. नुकतीच पीडित महिलाने तिची खोली बदलली. तिने भाड्याने नवीन खोली घेतली होती. हीमाहिती तिने शहाला सांगितली. त्यावर शहाने तिच्याकडे पार्टीची मागणी केली असता. पीडित महिला त्याला नकार देऊ शकली नाही. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपी शहा हा बिअरची बाटली घेऊन पीडित महिलेच्या घरी आला. दोघांनी मद्यपान केल्यानंतर पीडित महिला नशेत धुंद होती.

हेही वाचाः-पैसे न दिल्याच्या रागातून विकासकावर गोळीबार, दोघांना अटक

महिलेच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन शहा याने तिच्यावर ३ वेळा अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी महिला शुद्धीवर आल्यानंतर आपल्यासोबत शहाने गैरकृत्य केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने जोगेश्वरी पोलिस ठाणे गाठले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३७६ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय