११ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या


११ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

राज्यातील ११ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामधील काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. राज्याचे उपसचिव कैलाश गायकवाड यांनी राज्यपालांच्या आदेशानंतर पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.


परमबीर सिंह यांना पदोन्नती

महत्वाचे गुन्हे उघडकीस आणत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना पदोन्नती देऊन त्यांची अप्पर पोलिस महासंचालक ( कायदा व सुव्यवस्था) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांना देखील पदोन्नती देऊन त्यांची अप्पर पोलिस महासंचालक ( सामुग्री व तरतूद) पदी नियुक्ती केली आहे. गृह विभागात प्रधान सचिव म्हणून जबाबदारी उत्तमरित्या हाताळलेल्या रजनिश सेठ यांची अप्पर पोलिस महासंचालक ( लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) म्हणून नियुक्ती झाली आहे. तर कारागृह महानिरीक्षक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांची नागपूर पोलिस आयुक्तपदी, गुन्हे अन्वेषन विभागाचे महासंचालक संजय कुमार यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तपदी, राज्य गुन्हे अभिलेखा विभागाचे महासंचालक संजीव के सिंघल यांची अप्पर पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषन विभाग, पुणे) पदी, तर लाचलुचपतचे अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांची ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.


अमिताभ गुप्ता प्रधान सचिव 

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर.के .पदमनाभन् यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली अाहे. अप्पर पोलीस महासंचालक नियंत्रक विभागाचे अमिताभ गुप्ता यांची गृहविभागाच्या प्रधान सचिवपदी तर पुणेे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



हेही वाचा -

बनावट आयफोनची विक्री व्यापाऱ्याला पडली महागात

मेट्रोमोनियल साईटवर जोडीदार शोधताय, सावधान !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा