बनावट आयफोनची विक्री व्यापाऱ्याला पडली महागात

आयफोनच्या प्रेमात पडलेल्या एका २२ वर्षीय तरुणीला गंडवणाऱ्या मो. अहमद मुमताज अहमद विरभाई (२१) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

बनावट आयफोनची विक्री व्यापाऱ्याला पडली महागात
SHARES

विनात्रास, झटपट आणि घरपोच वस्तू पोहोचवणाऱ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागल्याचा फायदा आता चोरटे उचलताना दिसत आहेत. इंटरनेटवर एक वस्तू दाखवायची आणि विक्री मात्र दुसऱ्याच वस्तूची करायची. त्यामुळे या खरेदी मार्गातील खाचखळगे लोकांना दिसू लागले आहेत. आयफोनच्या प्रेमात पडलेल्या एका २२ वर्षीय तरुणीला अशा प्रकारे गंडवणाऱ्या मो. अहमद मुमताज अहमद विरभाई (२१) याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

माहिमच्या एल.जे.रोड परिसरात राहणारी आकांक्षा सिंग ही तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. आकांक्षाचा मोबाइल खराब झाल्यामुळे ती ऑनलाईन मोबाइल खरेदी करण्याच्या विचारात होती. त्यावेळी एका वेबसाईटवर आयफोनची किंमत १९,९൦൦ हजार रुपये पाहिली. कमी किंमतीत आयफोन मिळत असल्यानं क्षणाचाही विलंब न करता आकांक्षाने तो मोबइल बुक करण्यासाठी १९०० रुपये आगाऊ दिले. त्यानुसार त्याच महिन्यात मोबाइलची डिलिव्हरी झाल्यानंतर आकांक्षाने उर्वरित १७,९१० रुपये दिले.


तरुणीची फसवणूक

कालांतराने आकांक्षाने मोबाइलवरील पॅकिंग काढून फोन पाहिला असता तो बनावट आयफोन असल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी आकांक्षाने ज्या वेबसाईटहून मोबाइल बुक केला होता. त्या साईटवरील आरोपी मो. अहमद मुमताज अहमद विरभाईच्या मोबाइलवर फोन केला. त्यावेळी विरभाईने तुमचे पैसे परत पाठवण्यात येतील, असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतर विरभाईने आकांक्षाला टाळण्यास सुरुवात केली. तसंच त्याचा मोबाईलही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आकांक्षाने याची तक्रार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नोंदवली.


आरोपीला अटक

पोलिसांनी संबधित वेबसाईटचा माग काढला असता मो. अहमद मुमताज अहमद विरभाई हा गुजरातचा व्यापारी असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी त्याला या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा