बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने ट्रान्सजेंडरवर हल्ला

फक्त इतकेच नाही तर त्याला फिनाईल पिण्यास भाग पाडले, अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली.

बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने ट्रान्सजेंडरवर हल्ला
SHARES

बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने एका 28 वर्षीय ट्रान्सजेंडर व्यक्तीवर ब्लेडने हल्ला करण्यात आला. फक्त इतकेच नाही तर त्याला फिनाईल पिण्यास भाग पाडले, अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली. हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून हल्लेखोरांपैकी एकाला अटक केली आहे. तर इतर दोन बलात्काराचे आरोपी आणि त्यांची पत्नी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 1.45 च्या सुमारास पीडिता मित्रासोबत घरी जात असताना ही घटना घडली. जुहू तारा रोडवर आल्यानंतर, तीन आरोपी ऑटोरिक्षातून बाहेर आले आणि त्यांनी पीडितेच्या मानेवर आणि खांद्यावर ब्लेडने वार केले आणि तिला फिनाईल पिण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.

तिच्यासोबत असलेल्या पीडितेच्या मित्राने तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेले.

“आम्हाला या घटनेची तक्रार मिळाली आणि त्यांना विलेपार्ले येथून अटक केली. अन्य दोघे पती-पत्नी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी सांगितले.

पीडितेने 2014 मध्ये एका आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला केस मागे घेण्याच्या धमक्या येत होत्या. पीडितेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा