ट्रॉम्बेमध्ये दोन लाखांची अनधिकृत दारू जप्त


SHARE

अनधिकृतरित्या दारूची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तारक भादूर सोनार (35), फिरोज खान (27) अशी या आरोपींची नावे असून यामध्ये एका 55 वर्षाच्या महिलेचा देखील समावेश आहे. 

या आरोपींकडून पोलिसांनी दोन लाखांची दारू हस्तगत केली आहे. ट्रॉम्बेतील मंडला परिसरात दारूने भरलेला एक टेम्पो येणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी टेम्पोदेखील जप्त केला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या