टीआरपी प्रकरण: ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल


टीआरपी प्रकरण: ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
SHARES

टीआरपी प्रकरणात आज विशेष तपास पथक (CIU)ने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी रिपब्लिकचे विकास खानचंदानी, रोमिल रामगडीया आणि पार्थो दासगुप्तां यांच्याविरोधात ३६०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात प्रिया मुखर्जी,शिवा सुंदरम, शिवेंदो मुलेंदकर आणि रॉबर्ट वॉल्टर आणि रिपब्लिकशी संबंधित आणखी काही जण त्याचबरोबर अमित दवे, संजीव वर्मा आणि महामुव्हीज चॅनेल्सशी इतर काही जणांचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचाः- बेरोजगारांसाठी खूशखबर, पोलीस दलात तब्बल १२ हजार पदांची भरती

आतापर्यंत ओळख पटली नसलेला रॉकी नावाचा आरोपी अजून फरार आहे.५९ जण या आरोप पत्राचे साक्षीदार आहेत.त्याचबरोबर १२ जणांच्या तज्ञांच्या पथकाचे मत या आरोपपत्रात समाविष्ठ करण्यात आली आहेत. याप्रकरणी  जवळपास ५० लाख रुपयांच साहित्य जप्त करण्यात आलंय. यामध्ये घड्याळ, सोन्याचे दागिने, मोबाईल्स, लॅपटॉप्स, आणि इतर साहित्य आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि व्हाट्सअप चॅटिंगची पडताळणी होणार आहे. बीएआरसी ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.  या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास ३ हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते.

हेही वाचाः- बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणार्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४०६, १२०(ब),२०१, २०४, २१२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी१५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने प्रकरणी १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा