‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे


‘महामूव्ही चॅनेल’ला पोलिसांनी लावले टाळे
SHARES

मुंबईच्या टीआरपी प्रकरणात चर्चे आलेलं महामूव्ही या चँनेलच्या कार्यालयाला अखेर मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने ताळे ठोकले आहे. महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे. त्यामुळे आता चॅनलला प्रसारण करता येणार नाही. तर या कंपनीचे ओनर दर्शन सिंह आणि विश्वजित शर्मा यांना पोलिसांनी फरार घोषीत केलं आहे.

टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून पदार्फाश करण्यात आला होता. जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या कॉपीराईट प्रकरणात ‘महामुव्ही’ विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर गुन्हे शाखेने ‘महामुव्ही’ वाहिनीच्या प्रवर्तक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली होती. यानंतर आता महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे. पोलिसांनी महाव्हीच्या कार्यालयातून तब्बल ३४० चित्रपटांची साहित्य जप्त केली आहेत. त्यामध्ये लावारिस, जंजीर, मोहब्बत के दुश्मन, मुकद्दर का सिकंदर आणि जादूगार अशा सिनेमाची कंटेंट जप्त केली आहे.

यापूर्वी, बॉक्स सिनेमाच्या सर्व्हर आणि कंटेंटला गेल्या आठवड्यात सील करण्यात आला आले आहे. ते चॅनेलही यापुढे प्रसारित होणार नाही. त्याशिवाय महामुव्ही चॅनलचा आर्थिक लेखापरीक्षण  केले जाणार आहे. तसेच दर्शन सिंह यांच्यावर एलओसी (लुक आऊट नोटीस) जारी करण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा