TRP scam: चॅनेल पाहण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळण

या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक कोळावडे याच्या कबूली नाम्यामुळे रिपब्लिक चॅनेलचा पाय खोलात अडकला असल्याचे दिसून येते.

TRP scam: चॅनेल पाहण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळण
SHARES

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे आणि त्यासाठी हवालाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. टीआरपी वाढवण्यासाठी जानेवारी ते जुलै या दरम्यान कोट्यावधी रुपये मिळाल्याची कबूली आरोपीने पोलिसांना दिली. न्यायालयात पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचाः- बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्याला महापालिकेनं दिले ३० कोटी
बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक कोळावडे याच्या कबूली नाम्यामुळे रिपब्लिक चॅनेलचा पाय खोलात अडकला असल्याचे दिसून येते. अभिषेकने रिपब्लिक वाहिनीचा टीआरपी वाढविण्यासाठी प्रति महिना १५ लाख रुपये मिळत होते, अशी कबूली पोलिस चौकशीत दिली आहे. यातील काही रक्कम वितरक असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने म्हटले आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी अभिषेक याच्या घराची आणि आशीष याच्या पोखरण येथील कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेक याच्या घरातून तर दोन लाख रुपये अशीष याच्या कंपनी कार्यालयातून हस्तगत करण्यात आले. या घोटाळ्यातील एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता एक मुख्य आरोपीदेखील माफीचा साक्षीदार होण्याच्या तयारीत आहे. काही आरोपी माफीचे साक्षीदार झाल्यास पोलिसांना इतर आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यास मदत होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा