TRP scam: हंसाचे वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

विनय त्रिपाठी ट्रान्झिट रिमांडवर १५ आँक्टोंबर मिळाले असून त्याला उद्या मुंबईत आणण्याची शक्यता आहेत. तर उर्वरित ४ आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १६ आँक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे.

TRP scam: हंसाचे वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
SHARES

फेक टीआरपीप्रकरणात गुन्हे शाखेच्या सीआयू पथकाने मंगळवारी हंसाचे प्रवीण निझार आणि नितीन देवकर यांची पून्हा चौकशी केली. या दोघांनी या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांनी मागवलेली कागदपत्रेही जमा केली असून गुन्हे शाखेच्या एसआयटी पथकाने आज परळच्या बार्कच्या कार्यालयाला भेट देत त्यांच्या कामाची पद्धत आणि तांत्रिक गोष्टी समजून घेतल्याचे पोलिसांकडून सांगणअयात आले आहे.

हेही वाचाः-MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली

फेक टिआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास दिवसेंदिवस खोलवर जात आहे. तपासा दरम्यान पोलिस आरोपी आणि संशयितांची सखोल चौकशी करत असून त्यांच्याकडून जप्त केलेल्या आणि मागवलेल्या सर्व कागदपत्रांवर बारकाईने लक्ष घालत आहेत. या दरम्यान पोलिसांनी हंसाकडे २०१५ पासून काम केलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या सर्व कामगारांची यादी मागवलेली होती. ती हंसाकडून मिळालेली असून यातील किती जणं आरोपींच्या संपर्कात होते. हे पोलिस पडताळून पहात आहेत. त्याचबरोबर घनश्याम सिंग डिस्ट्रिब्युटर हेड त्यांनीही काही कागदपत्रे जमा केली आहेत. तर काल विकास खानचंदाणी आणि घनश्याम सिंग यांची ९ तास चौकशी करण्यात आली. ते रात्री उशिरा चौकशीसाठी पोलिस आयुक्तालयात हजर झाले होते. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी देखील त्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार दोघंही चौकशीला हजर होते. तसेच या प्रकरणातील पाचवा आरोपी विनय त्रिपाठी ट्रान्झिट रिमांडवर १५ आँक्टोंबर मिळाले असून त्याला उद्या मुंबईत आणण्याची शक्यता आहेत. तर उर्वरित ४ आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १६ आँक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे.

हेही वाचाः-NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

 पोलिसांचा टीआरपी घोटाळ्यातील तपास हा योग्य दिशेने सुरू असतानाच, आता रिपब्लिक चॅनेल विरोधात अनेक जण जबाब देण्यासाठी पुढे येत आहेत. रिपब्लिकने पैसे देऊन चॅनेल बघण्यास सांगितल्याचे त्यांनी त्यांच्या चौकशीत सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  त्याच प्रमाणे या सर्व चॅनेलला जाहिरात देणाऱ्या एजन्सी मालकांचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली असून त्याचा एक भाग म्हणून मंगळवारी ग्रुपएम जाहिरात कंपनीचे सीईओ प्रशांत कुमार त्यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी त्याची तब्बल ७ तास चौकशी केली. त्याच बरोबर सॅम बल्सारा यांनी काही डॉक्युमेंट्स पाठवले आहेत. ही सर्व कागदपत्रे फॉरेन्सिक व्हेरिफिकेशन केली जाणार आहेत. तर  आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील समांतर तपास करणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा