कुलाब्यात महिलेचा अपघाती मृत्यू

 BEST depot
कुलाब्यात महिलेचा अपघाती मृत्यू

कुलाबा - ट्रकने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी कुलाबा परिसरात घडली. विल्यू कपाडिया (83) असं या वृद्ध महिलेच नाव असून, त्यांना सेंट जेजे रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. कुलाब्यातील सिग्नल सर्कल, शहिद भगतसिंग मार्गावर सिग्नल ओलांडताना या महिलेला ट्रकने धडक दिली होती. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला होता. मात्र शनिवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पोलीस अधिक तपास घेत आहेत.

Loading Comments