Advertisement

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्याला फसवणूकीप्रकरणी अटक

मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने पीएनजी ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून २५ लाख रुपयांचे सोने काही महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. मात्र, वारंवार मागणी करुनही त्यांनी बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचं अक्षय गाडगीळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्याला फसवणूकीप्रकरणी  अटक
SHARES
Advertisement

सोने खरेदी करून बिलाचे पैसे न देता २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. 


पैसे देण्यास टाळाटाळ

पीएनजी ज्वेलर्सचे अक्षय गाडगीळ यांनी अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती.  मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने पीएनजी ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून २५ लाख रुपयांचे सोने काही महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. मात्र, वारंवार मागणी करुनही त्यांनी बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचं अक्षय गाडगीळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 


चित्रपटातही भूमिका 

तक्रारीची दखल घेत चतुःश्रृंगी पोलिसांनी फसवणुकीची गुन्हा दाखल करत मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला मंगळवारी अटक केली.  झी टीव्हीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे मिलिंद दास्ताने घरोघरी पोहोचले आहेत. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लय भारी चित्रपटातही त्यांची भूमिका होती.हेही वाचा -

३०० परदेशी पक्षांची तस्करी, डीआरआयचे ७ ठिकाणी छापे

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला डमी उमेदवार, दोघांना अटकसंबंधित विषय
Advertisement