वृद्धाच्या फसवणूकी प्रकरणी टिव्ही कलाकाराला अटक


वृद्धाच्या फसवणूकी प्रकरणी टिव्ही कलाकाराला अटक
SHARES

अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांत सहकलाकार म्हणून काम करणाऱ्याला उत्तराखंड येथे एका वृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सलमान ऊर्फ जाकिर ऊर्फ अ ॅक्टर फिरोज जाफरी (४०) असे आरोपीचे नाव असू तो इराणी नागरिक असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

देहरादून, उत्तराखंड राज्य येथील पटेल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ डिसेंबर रोजी दोन अनोळखी इसमांनी वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या अंगावरील ५ लाख रुपयेकिमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता. या प्रकरणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. देहरादूनच्या पटेल नगर पोलिसांना तांत्रित बाबींच्या तपासात यातील आरोपी हा मुंबईच्या अंधेरी (प.), ओशिवरा भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार पटेल नगर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली.  गुन्हे शाखेच्या युनिट - ८ च्या पोलिसांनी आरोपीच्या तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपी फिरोज जाफरी याला ओशिवरा येथील जय अंबे सोसायटी येथून अटक केली.

हेही वाचाः- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

आरोपीने आतापर्यंत चितोड गड की राजकुमारी पद्मिनी, छत्रपती राजा शिवाजी, सावधान इंडिया या टीव्ही मालिकांबरोबरच गुलमलई, बहनचोर या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केल्याचे सांगून तो मी नव्हेच असा आव आणला. मात्र पोलिसांकडे असलेल्य ा तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी कामानिमित्त उत्तर भारत. पंजाब - चंदीगड अशा ठिकाणी विमानाने प्रवास करून त्या ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करून लोकांची फसवणूक करून पुन्हा विमानानेमुंबईत परतत होता. त्याच्या विरोधात नागपूर शहरात तीन, तर उत्तराखंड येथे दोन गुन्हे दाखल असल्याचेउघड झाले आहे. फिरोज जाफरी या आरोपीला पोलिसांनी देहरादून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा