मानखुर्द जकात नाक्यावर दोन अपघात

 Mankhurd
मानखुर्द जकात नाक्यावर दोन अपघात
Mankhurd, Mumbai  -  

मानखुर्द जकात नाका परिसरात सोमवारी मध्यरात्री दोन अपघात झाले. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पहिला अपघात खाजगी बस व बेस्ट बसमध्य झाला. ही दोन्ही वाहने तात्काळ हटवण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात एका डंपरला ट्रॅव्हल्सच्या बसने मागून धडक दिली. या अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसमधून तेल गळती होऊन हे तेल रस्त्यावर सांडले होते. बसला क्रेनच्या मदतीने हटवण्यात आले. 

रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे अन्य वाहने घसरून अपघात होण्याचा धोका होता. त्यामुळे अग्निशमन दल व वाहतूक पोलिसांनी सांडलेले तेल स्वच्छ केले व पुढील धोका टळला. यामुळे रात्री उशीरापर्यंत वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक कासवगतीने सुरू होती.

Loading Comments