व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

दहिसर परिसरात व्यापाऱ्याचा व्यवसाय असून त्याच्याकडे आरोपी चालक हा कामाला होता. दररोज व्यापाऱ्यासोबत फिरत असल्याने चालकाने व्यापाऱ्याकडून होणाऱ्या पैशाची उलाढाल पाहिली होती.

व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
SHARES
मुंबईतील दहिसर परिसरातील व्यापाऱ्याची गाडी चोरून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या लालसेपोटी या दोघांनी हे कृत्य केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. या दोघांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.

दहिसर परिसरात व्यापाऱ्याचा व्यवसाय असून त्याच्याकडे आरोपी चालक हा कामाला होता. दररोज व्यापाऱ्यासोबत फिरत असल्याने चालकाने व्यापाऱ्याकडून होणाऱ्या पैशाची उलाढाल पाहिली होती. त्यानुसार लालसेपोटी मित्रांच्या मदतीने व्यापाऱ्याला गंडा घालण्याचं ठरवलं. त्यानुसार चालकाने व्यापाऱ्याची महागडी गाडी पळवून त्याच्याजवळ दीड लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी भंगारात तोडण्यासाठी देण्याची चालक धमकी देऊ लागला. त्यानुसार मालकाने दीड लाखांचा चेक दिला. एवढ्यावरच न थांबता त्या चालकाने मित्राच्या मदतीने व्यापाऱ्याला गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

 दोघांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर व्यापाऱ्याने बोरिवली पोलिसात तक्रार नोंदवली. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता. हा गुन्हा गुन्हे शाखा १२ कडे वर्ग करण्यात आला. तपास करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.हेही वाचा -

फॅन्सी नंबर प्लेट पडणार महाग, आता दंड नाही तर होणार 'ही' शिक्षा

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्तीसंबंधित विषय