अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक


अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक
SHARES

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाने बॉलिवुडमधील ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केल्यापासून, यामध्ये बॉलिवुडच नाही तर राजकीय तसेच इतर क्षेत्रामधील अनेक तस्करांचा समावेश असल्याचे समोर आले असुन, त्यानुसार, एनसीबीने छापेमार करीत फायर अधिका-यासह दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध

मोहम्मद नजीन खान व संदीप चव्हाण अशी अटक आरोपीची नावे आहेत. यातील चव्हाण पीएसयूमध्ये फायर ऑफिसर म्हणून कामाला आहे. एनसीबीने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी केली होती. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.एमडी ड्रग्स दोघांकडून जप्त करण्यात आले आहे. सोमवारी देखील एनसीबीकडून यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. सोमवारी ड्रग प्रकरणात दोन नायजेरियन लोकांना अटक करण्यात आली होती. एमडी आणि कोकेनची तस्करी करणा-या या दोघांना अटक केली गेली होती. ५०० ग्रॅम एमडी, चरस आणि गोळ्यांच्या माध्य्ामातुन कोकेनची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये हायप्रोफाइल लोकं असल्याची धक्कादायक माहिती मिळते आहे.

हेही वाचाः-  लवकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

जुहूमधल्या एका हॉटेलमसमोर हायप्रोफाईल ग्राहकांना नायजेरीन पेडलर कोकेनच्या गोळ्या विकत असल्याचे निष्पन्न झाले होते. धक्कादाय्ाक म्हणजे एनसीबीने अटक करताना त्याने  कोकेनच्या सर्व गोळ्या गिळल्या. सोमवारी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या नायजेरियन पेडलरकडून एनसीबीने आतापर्यंत कोकेनच्या १२ कॅप्सूल्स जप्त केल्या आहेत. तर याचा अधिक तपास सुरु आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा