सावधान ! सायन-पनवेल हायवेवर चोरांचा सुळसुळाट


सावधान !  सायन-पनवेल हायवेवर चोरांचा सुळसुळाट
SHARES

लाॅकडाऊननंतर मुंबईच्या पोलिसांचा रस्त्यावरील बंदोबस्त उठल्याचा फायदा घेऊन काही भूरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका डंपरचालकाला लूटण्यासाठी या चोरांनी त्याची काच फोडून डंपर चालकाला थांबण्यास भाग पाडून लुटल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. या प्रकरणी मानखुर्द पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लाॅकडाऊन असल्यामुळे पोलिसांचा सर्व प्रमुख रस्त्यांवर चोख बंदोबस्त होता. त्यामुळेच मागील वर्षात गुन्हेगारीचा आलेख हा  फार कमी होता. मात्र लाँकडाऊन उठताच  भूरट्या चोरांनी आता पून्हा माना वर काढल्या आहेत. या चोरांचा उच्छाद इतका वाढला आहे की, दिवसा ढवळ्या हे चोर आता दुसऱ्याला लुबाडत आहेत. याचीच प्रचिती मानखुर्दमध्ये एका चालकाला आली. मिथू मुसाद शेख (३६) हा डंपर चालक असून शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास तो रॅबिटने भरलेला डंपर घेऊन चालला होता. त्यावेळी सायन-पनवेल हायवेजवळ मानखुर्द टी जंक्शन येथे दुचाकीहून आलेल्या दोघांनी मिथूला डंपर थांबवण्यासाठी त्याच्या डंपरच्या काचेवर दगड मारला.

हेही वाचाः- गुड न्यूज! देशभरात ‘या’ तारखेपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात

काचेवर दगड बसल्याने काचेला तडे गेले. त्यामुळे पुढे सर्व काही अस्पष्ट दिसू लागले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मिथू आणि क्लिनर यांनी डंपर रस्त्याच्या कडेला नेहून उभा केला. त्यावेळी दुचाकीहून आलेले आरोपी शानवाज बद्दीन खान (२६), साईकिरण किशोर सावंत या दोघांनी चालकाला लुटले. चालक मिथू आणि क्लिनरचे मोबाइल आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम काढून घेत आरोपींना पळ काढला. या प्रकरणी मिथू ने मानखुर्द पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. यातील आरोपी साईकिरणवर या पूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा