विमानतळावर सोने तस्करी, दोघांना अटक

या दोघांजवळ सीमा शुल्क विभागाला तब्बल २.८ किलो सोनं जप्त केलं आहे.

विमानतळावर सोने तस्करी, दोघांना अटक
SHARES

दिवसेंदिवस देशात सोन्याच्या किंमतीत कमालीची वाढ झालेली आहे. हे पाहता सोने तस्करांनी छुप्या पद्धतीने तस्करी सुरू केली आहे. दुबईहून येणाऱ्या अशाच दोन तस्करांना सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने(एआययू)ने अटक केलेली आहे. या दोघांजवळ सीमा शुल्क विभागाला तब्बल २.८ किलो सोनं जप्त केलं आहे.

हेही वाचाः- TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी

 मुंबई विमातळावर केलेल्या कारवाईत दुबईतून आलेल्या दोन प्रवाशांना २.८  किलो सोन्यासह पकडले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५८ लाख रुपये आहे. एआययूला काही प्रवासी बेकायदेशिररित्या सोने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सोमवारी दोन भिन्न एअरवेजमधून प्रवास करणा-या दोन प्रवाशांना एआययूने ताब्यात घेतले. त्याच्या तपासणीत एकाकडे १४२९ ग्रॅम, तर दुस-याकडे १२८९ ग्रॅम सोने सापडले आहे. ते पावडर स्वरूपात लपवून आणण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५८ लाख रुपये आहे. दोनही प्रवाशांना अटक करण्यात आली असून सीमाशुल्क कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एआययूने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा