सोनं तस्करी प्रकरणी विमानतळाहून दोघांना अटक


सोनं तस्करी प्रकरणी विमानतळाहून दोघांना अटक
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २७०० ग्रॅम सोन्यासह दोन प्रवाश्यांना सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. दोनही प्रवासी दुबईवरून मुंबईत आले होते.

तरन्नुम खान व विशाल ओबेरॉय अशी अटक करण्यात आलेल्या प्रवाशांची नावे आहेत. ओबेरॉय हा सायन कोळीवाडा येथील रहिवासी असून त्याच्याकडे मॉरिशिअस देशाचे पारपत्र आहे. दोघांकडून पांढरी कोटींग असलेले २७०० ग्रॅम क्रुड सोने सापडले आहे. त्यांची किंमत एक कोटी १८ लाख रुपये आहे. या प्रवाशांनी बॅगेमध्ये सोने लपवले होते. दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांनाही न्यायालयीने न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपींच्या मागे एखादी टोळी कार्यरत आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा