दोन बांग्लादेशींकडे सापडला भारतीय पासपोर्ट


दोन बांग्लादेशींकडे सापडला भारतीय पासपोर्ट
SHARES

मुंबई विमानतळावर दोघा बांग्लादेशींकडून भारतीय पासपोर्ट जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांकडे सापडलेल हे पासपोर्ट बनावट असून, या प्रकारणी फारूक उमेर (23) आणि हुसैन अली(25) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

उमेर आणि हुसेन हे बुधवारी बांग्लादेशवरुन टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांना अाफ्रिकेच्या मलावी (Malawi) येथे जायचे होते. गुरुवारी इथियोपियन एअरलाइनने उड्डाणापूर्वी इमिग्रेशनमध्ये अधिकाऱ्यांना त्याच्या तपासणीत भारतीय पासपोर्ट सापडले. बांग्लादेशातून टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या बांग्लादेशाकडे बनावट भारतीय पासपोर्ट असणे ही धोक्याची घंटा होती. तात्काळ इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

आम्ही या दोघांनाही फसवणुकीच्या विविध कलमांतर्गत अटक केली आहे. शुक्रवारी दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले असून, कोर्टाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव मुखेडकर यांनी दिली.

हे दोघेही बांग्लादेशी तर आहेच पण त्यांना त्यांची भाषा सोडून इतर कोणतीही भाषा येत नसल्याने हे बनावट पासपोर्ट दोघांकडे आले कसे? आणि या मागाचा हेतू काय? हे पोलिसांना अद्याप समाजू शकलेल नाही. आता पोलिस दुभाषिकाच्या मदतीने दोघांची चौकशी करणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा