रविवारच्या मुंबईच्या सामन्यांवर सट्टेबाजी, दोन सट्टेबाजांना मालाडमधून अटक

या दोन्ही आरोपींनी सट्टेबाजीकरता वापरलेल्या मोबाइलमधील सीम कार्ड हे बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले होते.

रविवारच्या मुंबईच्या सामन्यांवर सट्टेबाजी, दोन सट्टेबाजांना मालाडमधून अटक
SHARES

कोरोना संक्रमणामुळे भारतात होणारे आयपीएलचे सामने दुबईला भरवण्यात आले. त्यामुळे सट्टेबाजीला लगाम लागेल असे वाटत असताना. रविवारी मुंबई आणि राजस्थान राँयल्स या सामन्यांवर मालाडमध्ये सट्टेबाजी करणाऱ्यांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकऱणी पोलिसांनी दोघांना अटक केले असून त्या दोघांच्या संपर्कात असलेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचाः- “स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला कधी कानाखाली तरी दिली आहे का?”

दुबईत सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर मालाडमधून सट्टेबाजी सुरू असल्याची तक्रार  गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. रविवारी असल्याने आणि त्यात मुंबई विरूद्ध राजस्थान राँयल्स या दोन बलाढ्य संघाचा सामाना असल्याने अनेकांनी सट्टा लावला होता. या दोन्ही आरोपींनी सट्टेबाजीकरता वापरलेल्या मोबाइलमधील सीम कार्ड हे बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले होते.  Admin.lotusbook247.com या वेबसाईटच्या मदतीने क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात होता.

हेही वाचाः- राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात

याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी मालाडच्या दप्तरी रोड परिसरात सापळा रचून या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी बनावट सिमकार्ड वाले मोबाइल, १२ हजार २४० रोख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या दोघांकच्या संपर्कात अनेक सट्टेबाज असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिस तपास करत असून न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २८ आँक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय