दोन सफाई कामगारांचा गटारात पडून मृत्यू


दोन सफाई कामगारांचा गटारात पडून मृत्यू
SHARES

चांदिवली फार्म रोड येथील कमानी ऑईल मिल जवळील गटार साफ केल्यानंतर त्यात पडलेला मोबाइल काढताना विषारी वायूच्या प्रभावात येऊन दोन खासगी सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजय कुचीकोरवे आणि सचिन पवार अशी दोघांची नावे आहेत.

कमानी आॅईल मिल जवळील मलनि:सारण वाहिनी खासगीरित्या साफ केल्यानंतर सफाईचे काम नीट झाले आहे की नाही, हे पाहण्यासाठी अजय याने या गटारीत डोकावून पाहिले. त्याचवेळेस त्याचा मोबाइल फोन गटारीत पडला. हा फोन काढण्यासाठी अजय गटारीत उतरल्यानंतर गटारीतील विषारी वायूमुळे तो बेशुद्ध होऊन तेथेच पडला. त्याला वाचवण्यासाठी सचिन गटारीत उतरल्यावर त्यालाही विषारी वायूची बाधा झाल्याने तोदेखील बेशुद्ध झाला.

हा प्रकार बाजूला बसलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने दोघांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी अधिक तपास सुरू केला अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा