तीच त्यांची शेवटची चूक ठरली...

Aarey Colony
तीच त्यांची शेवटची चूक ठरली...
तीच त्यांची शेवटची चूक ठरली...
तीच त्यांची शेवटची चूक ठरली...
तीच त्यांची शेवटची चूक ठरली...
See all
मुंबई  -  

आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 16, वनीचा पाडा येथील विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या पाचपैकी दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. प्रथमेश संजय मालवणकर (17) आणि शुभम सदानंद शर्मा (17) अशी दोघांची नावे आहेत. यातल्या काहींना पोहता येत नसूनही ते विहिरीत उतरले, आणि तीच त्यांची शेवटची चूक ठरली.
आरे कॉलनीत आले होते फिरायला...

अंधेरीतील एका खासगी क्लासमध्ये शिकणारे पाच कॉलेज तरुण शिकवणी संपल्यानंतर आरे कॉलनीत फिरण्यासाठी आले होते. हे सर्व विद्यार्थी 12 वीत शिकणारे अाहेत. आरे कॉलनीत फिरत असताना त्यांना युनिट क्रमांक 16, वनीचा पाडा येथे विहीर दिसली. या विहिरीत तीन तरुण सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले.एकालाच येत होते पोहता...

तीनपैकी केवळ एकाच तरुणाला पोहता येत होते, तर दोघांना पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघेजण भिंतीच्या आधाराने पोहण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळेस त्यातील एकजण बुडू लागला. पोहता येणाऱ्या तरूणाने बुडणाऱ्या तरूणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला वाचवता वाचवता तोही बुडू लागला. विहिरीबाहेर उपस्थित असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणात ते दोघेही विहिरीच्या तळाशी गेले.लाईफगार्ड वेळेवर आलेच नाही...

आरे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ओवाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी अंधेरी पूर्वेकडील खासगी क्लासमध्ये शिकत होते. त्यांच्या क्लासची वेळ सकाळी सात ते साडेदहाची होती. परंतु त्यांचा क्लास साडेआठलाच सोडण्यात आल्याने हे सर्व तरुण आरेत आले. मृत प्रथमेश मालवणकर अंधेरी, तर शुभम शर्मा विलेपार्ले येथे राहणारे आहेत. या तरुणांना विहिरीच्या खोलीचा अंदाज न आल्यानेच ते बुडाले. त्यांच्या तीन मित्रांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून दोघेजण बुडत असल्याची माहिती दिली. मात्र, पोलिस आणि 'एनडीआरएफ'चे पथक घटनास्थळी येईपर्यंत दोघेही बुडाले होते. 'एनडीआरएफ'च्या लाईफ गार्डनी विहिरीत उतरुन दोघांना बाहेर काढले. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.