वांद्र्यात दोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

 Bandra
वांद्र्यात दोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

वांद्रे - पाचशे आणि हजार अशा दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा खेरवाडी पोलिसांनी पकडल्या आहेत. यासोबतच चार जणांना अटक केली असून 1 जण फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक ऑडी कार आणि पैशांची बॅग जप्त केली आहे.

बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास खेरवाडी पोलिसांना खबऱ्याकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून 2 कोटी 1 लाख 62 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या. विनोद देसाई, सचिन सुमारिया, ईमताज मुलानी, सुरेश कुंभार अशी आरोपींची नावे आहेत. तर राजेश डहाणूकर हा फरार झाला आहे.

Loading Comments