अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला, 2 डहाणूकर महिलांचा मृत्यू

 Palghar
अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला, 2 डहाणूकर महिलांचा मृत्यू
Palghar, Mumbai  -  

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांना जीव गमवावा लागला. यामध्ये डहाणूतील दोन महिलांचा समावेश असून निर्मला ठाकुर आणि उषा सोनकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरने डहाणूत आणण्यात आले.

सोमवारी रात्री अनंतनागहून निघालेल्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात सात जण मारले गेले. त्यामध्ये डहाणूच्या निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात डहाणूत राहणारे यशवंंत डोंगरे, योगिता डोंगरे आणि प्रमोद वजनी हे तिन्ही जण जखमी झाले.

या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या दहशतवाद्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील होत आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments