बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणारे अटकेत

  Mankhurd
  बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणारे अटकेत
  मुंबई  -  

  कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना मानखुर्द पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. मोहमद अली अब्दुल अजीज शेख (40) आणि फरिदा हसन शेख(58) अशी या आरोपींची नावे आहेत. 

  मानखुर्दमधील करबला मैदानाशेजारी असलेल्या रेल्वे संक्रमण वसाहतीत हे आरोपी बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा मारून देशी मद्याच्या 70 बाटल्या जप्त केल्या तसेच या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यानुसार पोलीस यामध्ये अधिक तपास करत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.