भरधाव डंपरची चार वाहनांना धडक

 Chembur
भरधाव डंपरची चार वाहनांना धडक
भरधाव डंपरची चार वाहनांना धडक
भरधाव डंपरची चार वाहनांना धडक
See all

चेंबूर - सायन-ट्रॉम्बे महामार्गावरील मैत्रीपार्क येथे शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत असलेल्या एका डंपर चालकाने चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन चारचाकी आणि दोन रिक्षांचा समावेश आहे. दारूच्या नशेत असलेला डंपर चालक पंकज कुमार हा मानखुर्दवरून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो या वाहनांवर आदळला. यामध्ये मोहम्मद शेख (वय 30) व अशोककुमार बिन (वय 43) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत गोवंडी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Loading Comments