वडाळा भक्तीपार्कमध्ये कारला अपघात

 wadala
वडाळा भक्तीपार्कमध्ये कारला अपघात
वडाळा भक्तीपार्कमध्ये कारला अपघात
See all

वडाळा - वडाळ्याहून सीएसटीमार्गे धावणाऱ्या I-20 होंडा कारचा वडाळा भक्तीपार्क येथे रस्त्याच्या दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली.

अपघात इतका भीषण होता की दुभाजकाच्या बाजूचा लोखंडी पोल वाहनाच्या मागील काचेत घुसला. या घटनेत चालक आझाद खान (वय -24) हे सुदैवाने वाचले असून वाहन मालक मोसम कवाद (वय- 22) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना वडाळा टीटी पोलिसांच्या मदतीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस निरीक्षक पी.पी काळे अधिक तपास करत आहेत.

Loading Comments