अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका, दोघांना अटक

अल्पवयीन मुलींकडून चालवला जात होता वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून नववीच्या मुलीची सुटका दोन आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका, दोघांना अटक
SHARES

अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायात ओढून त्यांचा वापर करणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज बेड्या ठोकल्या आहेत.. याप्रकरणी एक महिला अनेक पुरुष आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष बाराने अटक केली असून नववीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका सुद्धा केलेली आहे.

       मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 12 अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदामार्फत अशी माहिती मिळाली होती की एक टोळी अल्पवयीन मुलींना या सगळ्या व्यवसायांमध्ये ओढून त्यांना पैशांचे प्रलोभन देते आणि त्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायात काम करण्यास भाग पाडते त्यानुसार बोगस गिर्‍हाईकाच्या मार्फत पोलिसांनी सापळा लावून हे रॅकेट चालवणारी एक महिला आणि एका पुरूष आरोपीला अटक करून अल्पवयीन मुलीसोबत दोन बळीत महिलांची सुखरूप सुटका केलेली आहे.

       गुन्हे शाखा कक्ष 12 चे आणि पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकाला आरोपी महिला आणि पुरुष हे अल्पवयीन मुलींमर्फत वेश्यावसाय चालवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी बोगस गिर्हाईकच्या मार्फत या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे ठरवले..बोगस गिऱ्हाईकच्या फोनवरून आरोपीला फोन करून एका अल्पवयीन मुलीची विचारणा केली असता त्याने त्याबदल्यात 30 हजार रुपये द्यावे लागतील अशी माहिती दिली शिवाय त्यासोबत एक वयस्क महिला हवी असल्यास दोन्हीचे मिळून 45 हजार रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार असल्याचे सांगितले..पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाच्या मार्फत या डीलला होकार देऊन सापळा लावण्यासाठी आरोपीला दोन्ही मुलींना घेऊन गोरेगाव परिसरात येण्यास सांगितले..ठरल्याप्रमाणे आरोपी हा गोरेगाव मधल्या ऑबेरॉय मॉलच्या समोर एक अल्पवयीन मुलगी आणि दोन महिलासमवेत हजर झाला त्याचक्षणी सापळा लावलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी महिला आणि पुरुषाला बेड्या ठोकल्या आणि एका अल्पवयीन मुलीसोबत दोन वयस्क महिलांची सुखरूप सुटका केली.

      या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे तुषार चंद्रकांत दारुवाला (53 वर्षे ) आणि आफ्रिन सबा सलीम खान (25)  अशी असून या दोघांकरवी अल्पवयीन मुलींना या कामात ओढले जात असल्याची माहिती समोर आलीय..या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात पोक्सो आणि पिटा ऍक्टसहित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, आरोपींना दिंडोशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

      अल्पवयीन मुलींना टार्गेट करून पैशासाठी त्यांच्याकडून गैरकृत्य करून घेणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली कक्ष 12 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन गवस आणि त्यांच्या टीमने केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा