तुर्कस्थानातल्या हल्यात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

 Pali Hill
तुर्कस्थानातल्या हल्यात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

मुंबई - तुर्कस्थानातल्या इस्तंबूल शहरामध्ये झालेल्या हल्ल्यात झालेल्या मृतांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. त्यातील अबिस रिझवी नावाचा तरुण वांद्र्याचा रहिवासी आहे. अबिस हा राज्यसभेचे माजी खासदार आणि बांधकाम व्यावसायिक अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा असून तो रिझवी बिल्डर्सचा सीईओ होता. तर गुजरातच्या खुशी शहाला देखील या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. खुशीचंही खुशी झेड या नावानं जुहू येथे आलिशान बुटिक आहे.

इस्तंबूलमध्ये नवीन वर्षाची पार्टी सुरु असताना एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात 39 जणांना प्राण गमवावे लागले होते, ज्यात 15 परदेशी नागरिकांसह दोन भारतीयांचा समावेश आहे.

रीना क्लब नावाच्या नाइटक्लबमध्ये हा हल्ला झाला असून हा क्लब स्थानिकांसह परदेशी पाहुण्यांतही लोकप्रिय आहे. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान तब्बल 600 जण या क्लब मध्ये असताना दरवाज्यावरील पोलिसाला आणि एका नागरिकाला मारत हा हल्लेखोर आत शिरला आणि त्याने गोळीबार केला. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Loading Comments