घातक बाॅम्ब बनवण्याच्या प्रयत्नात स्फोट; दोन जण जखमी

सुतळी बाॅम्बच्या दारूपासून खिळे आणि काचांचे तुकडे वापरून घातक बाॅम्ब बनवत असताना ही दुर्घटना घडल्याचं तपासात उघडकीस अालं अाहे. हा स्फोट तितकासा घातक नव्हता. मात्र, त्याचा आवाज एक किलोमीटर अंतरावर ऐकू येईल इतका होता.

घातक बाॅम्ब बनवण्याच्या प्रयत्नात स्फोट; दोन जण जखमी
SHARES

सुतळी बाॅम्बच्या दारूपासून घातक बाॅम्ब बनवण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत अरजुल शेख (२२) अाणि एक अल्पवयीन आरोपी जखमी झाला आहे. हा घातक बाॅम्ब बनवण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत अाहेत.  

एक किमीवर अावाज

अॅन्टाॅप हिल नगर येथील गरीब नवाज रोडवरील नूर बाजारात दोघे अारोपी राहत होते. मूळचे पश्चिम बंगालचे रहिवाशी असलेल्या या दोघांच्या हालचाली मागील काही दिवसांपासून संशयास्पद होत्या. शनिवारी रात्री अचानक त्यांच्या खोलीत स्फोट झाला. हा स्फोट तितकासा घातक नव्हता. मात्र, त्याचा आवाज एक किलोमीटर अंतरावर ऐकू येईल इतका होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुतळी बाॅम्बच्या दारूपासून खिळे आणि काचांचे तुकडे वापरून घातक बाॅम्ब बनवत असताना ही दुर्घटना घडल्याचं तपासात उघडकीस अालं अाहे.


गुन्हे शाखेकडं वर्ग

गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून हा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

Exclusive: पीडित महिलेचा अपमान, गृहराज्यमंत्री केसरकरांविरोधात पोलिसांत तक्रार

डहाणूत समुद्रामार्गे ४ संशयित आल्याची चर्चा



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा