खार येथे नववर्षाच्या पार्टीत १९ वर्षीय तरुणीची हत्या


खार येथे नववर्षाच्या पार्टीत १९ वर्षीय तरुणीची हत्या
SHARES

मुंबईत नववर्षाच्या पार्टीत खार येथे एका १९ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खारच्या भगवती हाइट्समध्ये ही घटना घडली.  नववर्षा निमित्त इमारतीच्या गच्चीवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जान्हवी कुकरेजा असं या  मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

खारच्या भगवती हाइट्समध्ये पार्टी सुरू असताना. जान्हवी ने एका जोडप्याला अवघडलेल्या अवस्थेत पाहिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात संशयित श्री जोगधनकर आणि दियाने जान्हवीने मारहाण केली आणि तिचे केस पकडून तिला ओढत दुस-या मजल्यावर आणले. या झटापटीत जान्हवी टेरेसवरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना इमारतीच्या पाय-यांवर रक्ताचे डाग दिसले आहेत. शव भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  याप्रकरणी श्री जोगधनकर आणि  दिया पाडणकर  यांना अटक करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा