कुख्यात गुंड छोटा शकीलच्या बहिणीचे निधन


कुख्यात गुंड छोटा शकीलच्या बहिणीचे निधन
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मुंब्रा येथे राहणाऱ्या बहिणीचे मंगळवारी निधन झाले आहे. महिन्याभरापूर्वीच त्याच्या छोटा बहिणीचे हार्टअटैकने निधन झाले होते.  हमीदा फारूख सय्यद असे तिचे नाव असल्याचे कळते. मागील अनेक वर्षांपासून ती मुंब्रा परिसरात वास्तव्यास होती. एका महिन्यात शकीलला मिळालेल्या हा दुसरा झटका असल्याचे बोलले जाते.

छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा दुसरी. तिचे लग्न मुंब्रा येथील व्यापारी फारुक सय्यद याच्याशी झाले होते. फारुखचे कोणतेही अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही. तो गुन्हेगारी विश्वापासून लांब असल्याचे मानले जाते. भावंडांमध्ये शकीलचा क्रमांक तिसरा लागतो. तर त्यांची धाकटी बहीण फहमिदा हिचा निकाह आरिफ शेखशी झाला होता. छोटा शकीलसह  आरिफही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा हस्तक होता. काही दिवसांपूर्वी छोटा शकीलच्या  मीरारोड परिसरात राहणाऱ्या फहमीदा हिचा मृत्यू झाला होता. ती तिचा नवरा आरिफ आणि मुलांसोबत रहात होती. आरिफचा प्राँपर्टी एजंटचा व्यवसाय आहे. अचानक फहमीदाच्या छातीत दुखू लागल्याने तिला मुंबईच्या टूंगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान फहमीदाचा हार्टअटैकने मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले. फहमीदाची कोरोनाची टेस्ट ही करण्यात आली असून तिचा रिपोर्ट येणं बाकी होते. चार भावडांपैकी फहमीदा ही सर्वात छोटी असल्यामुळे घरात सर्वांची लाडकी होती. तिच्या अकाली मृत्यूची बातमी ऐकून शकिल भावूक झाला होता. फहमीदा पूर्वी दुबईत रहात होती. माञ २००६ साली ती मुंबईत वास्तव्यास आली. पूर्वी छोटा शकील आणि त्याचे कुटुंब मुंबईच्या टेंकर मोहल्ला परिसरात रहात होते. २०११ साली शकिलच्या वडिलांचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यातच आता दुसरी बहिण हमीदा हिच्या मृत्यूने शकीलला दुसरा झटका बसला आहे.

ट्रँव्हल एजंट ते अंडरवल्ड डाँन छोटा शकीलचा प्रवास

अंडरवल्ड डाँन दाऊदचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा छोटा शकील हा सध्या पाकिस्तानच्या कराचीत वास्तव्यास असल्याचे कळते. त्याच्यासोबत त्याचा भाऊ अनवर ही राहतो. छोटा शकील ६० च्या दशकात दक्षिण मुंबईच्या नागपाडा येथे ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा, याच दरम्यान त्याची ओळख दाऊदशी झाली. दोघांच्या विचारात इतकी साम्यता होती की, पुढे दोघे ही एक माफिया म्हणून उदयास आले. ते आजतागायत एकञ आहेत. दाऊदचा सर्वात महत्वाचा आणि विश्वासू म्हणून शकीलची ओळख आहे. १९८८ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर छोटा शकीलने सुमारे चार महिने तुरूंगात घालवले. जामीन मिळताच तो दाऊदसह दुबईला पळून गेला. नंतर १ मार्च १९९३ मध्ये या दोघांनी भारताच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मुंबई सीरियलची योजना आखली आणि राबवली. जागतिक दबावामुळे ते दोघे सध्या पाकिस्तानात लपून बसले आहेेत.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा