SHARE

मानखुर्द - मानसिक तणावातून एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मानखुर्दमधील जनतानगरमधून समोर आली आहे.

इरफान अब्दुल रहीम खान (26) असं या तरुणाचं नाव असून सोमवारी मध्यरात्री त्याने आत्महत्या केली. अनेक महिन्यांपासून हाताला काहीही कामधंदा नसल्याने तो तणावात होता. त्यामुळे पत्नीसोबत देखील त्याचे नेहमीच वाद होत असत. याच वादातून पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. दरम्यान सोमवारी रात्री तो घरात एकटाच असताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या बहिणीला ही बाब समजताच तिने तात्काळ मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.​

संबंधित विषय
ताज्या बातम्या