नेव्ही नगरमध्ये डोक्यावर झाड पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  Navy Nagar
  नेव्ही नगरमध्ये डोक्यावर झाड पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  मुंबई  -  

  कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये डोक्यावर झाड पडून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलाचे नाव राहुल कुमार असे आहे. या मुलाचे वडील विपन कुमार मदनमोहन हे नौदलात कर्नल पदावर कार्यरत आहेत.

  14 वर्षीय राहुल मंगळवारी सकाळी आपल्या मित्रांना भेटायला जात असताना सोमनाथ वाटिका, नेफ्रा परिसरातील गुलमोहराचे झाड अचानक त्याच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना घडताच जवळच उभ्या असलेल्या एका इसमाने नेव्ही पोलिसांच्या मदतीने राहुलला त्वरीत अश्विनी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  जी. टी. रुग्णालयात राहुलचे शवविच्छेदन करण्यात आले असून डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. राहुलच्या डोक्यावर पडलेल्या गुलमोहराच्या झाडाला वाळवी लागली असून ते आतून पोकळ झाल्यानेच कोसळल्याचे मुंबई पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.