कुर्ला यार्डात सापडला युवकाचा मृतदेह

 Kurla
कुर्ला यार्डात सापडला युवकाचा मृतदेह

कुर्ला - रेल्वे यार्डात गुरुवारी संध्याकाळी एका अज्ञात युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. 25 ते 30 वयोगटातील हा युवक आहे. कुर्ला रेल्वे यार्डात मालगाडी जाणाऱ्या ट्रॅकवर हा मृतदेह होता. युवकाची अजून ओळख पटली नाही आहे. पोलिसांनी मात्र तपास सुरू केला आहे. गेल्या 8 तारखेला रात्री टिळकनगर स्टेशनजवळ यार्डात एका सुटकेसमध्ये 12 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. त्या प्रकरणातही पोलिसांना ठोस धागेदोरे अद्याप सापडलेले नाहीत.

Loading Comments