दहिसरमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

 Dahisar
दहिसरमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

दहिसर - कोकणीपाडा परिसरातल्या वाघेश्वरी मंदिराजवळील जंगलात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. या व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केलीय. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस या व्यक्तीच्या कुटुंबियाचा शोध घेतायेत.

मृतदेहाच्या अंगावर लाल कलरचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आहे. याची उंची 6 फुट असून वय 50 किंवा 55 इतकं आहे. कुणाला या अज्ञात व्यक्तीची माहिती असेल तर त्यानं दहिसर पोलीस स्टेशन 02228284024 आणि पोलीस उपनिरिक्षक रावसाहेब शिंदे 7722084834 यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा सहायक पोलीस उपनिरिक्षक शिर्के 9821232141 यांच्याशी संपर्क करावा.

Loading Comments