मुलुंडमध्ये वडापावच्या गाडीचा भडका

मुलुंड - जे.एन.रोड परिसरातील एका वडापावच्या गाडीला सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. स्टोव्हमध्ये भडका उडाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या एका गाडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वडापावची गाडी मात्र जाळून खाक झालीय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.

Loading Comments