दारुच्या नशेत मित्राला पट्ट्यानं बडवलं

दारुच्या नशेत मित्राला पट्ट्यानं बडवलं
See all
मुंबई  -  

दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी चार मित्रांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवकाला कमलेश शेट्टी, सचिन गोरे, जयेश कांबळे आणि कालू मनी शेट्टी या त्याच्या चार मित्रांनी पार्टीसाठी घरी बोलावलं. त्यानंतर सगळेजण भरपूर दारू प्यायले. यावेळी दारूच्या नशेत असलेला पीडित मित्रांना उलटसुलट बोलू लागला. याचा राग आल्याने चौघांनी मिळून त्याला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या नराधमांनी पीडिताला नग्न करत लाथाबुक्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून तो वॉट्सअप ग्रुपवर व्हायरल देखील केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.