SHARE

नरिमन पॉईंट - मित्तल टॉवर इमारतीच्या सातव्या मजल्यावर सोमवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही सतरा मजली इमारत असून इमारतीत अनेक व्यावसायिक कार्यलय आहेत. इमारतीचे सुरक्षारक्षक बाबू राव माने यांनी तत्परता दाखवत आग विझवली. आग विझल्यानंतर तिथं अग्निशमन दल दाखल झाले. इमारतीच्या बी विंगमधल्या 77 क्रमांकाच्या कार्यलयात डागडुजीचे काम सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलं. माने यांनी दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे मोठी हानी टळली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या