लाखोंचे मोबाईल पोलिसांनी केले परत

 Mumbai
लाखोंचे मोबाईल पोलिसांनी केले परत
Mumbai  -  

वडाळा - हार्बर मार्गावरून प्रवाशांचे चोरीला गेलेले लाखो रुपयांचे मोबाईल वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या वतीने बुधवारी तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत. तर याप्रकरणी तीन मोबाईल चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या आठवड्यात हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच याविरोधात अनेक प्रवाशांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघा मोबाईल चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून तब्बल 14 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. या सर्व मोबाईलची किंमत 1 लाख 52 हजार 336 रुपये इतकी आहे. या चोरट्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम 379 आणि 411 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित तक्रारदारांची शहानिशा करून वरीष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.

Loading Comments