अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा वाॅचमन अटकेत


अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा वाॅचमन अटकेत
SHARES

मुंबईतल्या अंधेरीतील अंबोलीच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या इमारतीच्या वाँचमनला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानबा रघुनाथ भानगे (५०) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

नालासोपारा परिसरात राहणारा ज्ञानबा हा पीडित मुली रहात असलेल्या इमारती सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. मागील अनेक दिवसांपासून त्याची या मुलींवर घाणेरडी नजर होती. २५ जानेवारी रोजी सायंकाळी दोन मुली या इमारतीच्या परिसरात खेळत होत्या, त्यातील एकीचं वय ११, तर दुसरीचं वय १२ असे आहे. या मुली खेळत असताना आरोपी ज्ञानबाने त्यांना पाहिले. त्यानंतर त्यांना जवळ बोलावून ज्ञानबा त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी त्याने मुलींना दिली.

घाबरलेल्या मुली घरात दबक्या पावलांनी वावरत होत्या, मुलींच्या वागण्यावर पालकांना संशय आल्याने पालकांनी मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ज्ञानबावर अंबोली पोलिसांनी ३५४, ५०६ भा.द.वी. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा