शॉक लागून तरुणाचा मृत्यू

 Mumbai
शॉक लागून तरुणाचा मृत्यू

मानखुर्द - मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यालगत असलेल्या जाकीर हुसेननगरमध्ये विजेचा धक्का लागून हसरत अली (३७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी तो वेल्डिंगचे काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागला आणि तो बेशुद्ध पडला. शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ मानखुर्दमधील पंडित मदनमोहन मालवीय (शताब्दी) रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments