जेव्हा कार प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा...

  Mumbai
  जेव्हा कार प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा...
  मुंबई  -  

  अंधेरी - अंधेरी रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर रेल्वे ऐवजी इनोव्हा आल्यानं एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडलीय. प्लॅटफॉर्मवर इनोव्हा आली हे कळताच ती पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. राजेश यादव असं इनोव्हा चालकाचं नाव आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी राजेश यादव यांना 145,147,154 कलमान्वये अटक केलीय. दरम्यान आपण मालकाला सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होता, अंधेरी स्टेशनवर आल्यावर रस्ता न दिसल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा राजेशने केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.